Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल बँक शाखा काटी यांच्या वतीने प्रशाला व प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा गौरव

लोकमंगल बँक शाखा काटी यांच्या वतीने प्रशाला व प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा गौरव

=================================


तुळजापुर दि.५ ÷ तालुक्यातील काटी येथील जि.प.प्रशाला व प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा गौरव लोकमंगल मल्टीद स्टेट बँक शाखा काटी ता.तुळजापुर यांच्या वतीने करण्यात आला.शाखेचे शाखा मॅनेजर मा.श्री.गलांडे साहेब व  सहव्यवस्थापक श्री.विजय बोकडे साहेब यांनी शिक्षक दिनी शाळेत येऊन माजी राष्ट्रपती,थोर तत्वचिंतक,विचारवंत तथा शिक्षक प्रा.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले.त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.नितिन कोळी सर यांच्या शाल ,श्रीफळ,पुष्पुगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.श्री.पंकज कासार काटकर,श्री.गुरुप्रसाद भुमकर,श्री.हणुमंत कदम,श्री.राहुल सुरवसे,श्री.नागेश भोसले,श्रीमती.वैशाली पवार,श्रीमती.वैशाली क्षिरसागर,श्रीमती.समिना सय्यद श्रीमती.दैवशाला कांबळे ,श्री.अजित इंगळे ,सेवक किरण इगळे यांचा श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक श्री.पंकज कासार काटकर यांनी तर आभार हणुमंत कदम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments