धाराशिव येथे "पुण्य नगरी" वृत्तपत्र समूहाच्या श्री गणरायाची जिल्हाधिकारी ओम्बासे यांच्या हस्ते आज प्रतिष्ठापना
धाराशिव: देशातील सर्वात मोठा बहुभाषिक व अग्रगण्य वृत्तपत्र समूहाच्या धाराशिव जिल्हा कार्यालयात आराध्य दैवत श्री गणरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यंाच्या हस्ते करण्यात येणार आहे.धाराशिव शहरातील समतानगर येथील शिवछत्रपती चौकातील दैनिक 'पुण्य नगरी' वृत्तपत्र समूहाच्या जिल्हा कार्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आराध्य दैवत श्री गणरायांची मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.यावर्षीची प्रतिष्ठापना प्रथेप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.मंगळवारी (दि.१९)सायं. ५.३० वा. जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.या मंगलमय सोहळ्यास पुण्य नगरी परिवाराच्या मंडळीसह श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन 'पुण्य नगरी'चे वृत्त संपादक तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले आहे.
0 Comments