Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गाव बंदी, या गावच्या ग्रामपंचायतीने घेतला निर्णय

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गाव बंदी, या गावच्या ग्रामपंचायतीने घेतला निर्णय 



बीड- शिरूर तालुक्यातील राक्षसभुवन ग्रामपंचायतने मराठा  समाजाला जोपर्यंत कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकून पुढार्‍यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राक्षस भुवन तांबा ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
या पत्रावर पंडित खोले, दत्तात्रय तांबे ,किशोर खोले, निवृत्ती बेदरे , अनिल खोले, स्वप्नील खोले आदिसंह ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

0 Comments