Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील काटी प्रशाला व प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

तुळजापुर तालुक्यातील काटी प्रशाला व प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

=================================


तुळजापुर  : तालुक्यातील काटी येथील जि.प.प्रशाला (हायस्कुल) व प्राथमिक शाळा काटी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम भारताचे माजी राष्ट्रपती ,विचारवंत, थोर तत्वचिंतक ,शिक्षक डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात  आले .त्यांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात  आली.त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली.विद्यार्थ्यांनी प्रशालेतील सर्व शिक्षकवृंदांचा गुलाबपुष्प देवुन सत्कार केला.काही भेटकार्ड,भेटवस्तु विद्यार्थी यांनी स्वःत तयार करुन शिक्षकांना भेट दिल्या.गावचे उपसरपंच मा.श्री.जुबेर शेख सर  यांनी शाळेस भेट दिली.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करुन सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.कोळी सर,भुमकर सर, पवार मॅडम, क्षिरसागर मॅडम,सय्यद मॅडम ,पंकज काटकर सर,इंगळे सर ,कांबळे मॅडम,हणुमंत कदम सर,भोसले सर,सुरवसे सर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन श्रीमती.पवार यांनी तर आभार श्री.पंकज काटकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments