Hot Posts

6/recent/ticker-posts

केंद्र शासनाच्या विकास योजनांवर आजपासून पाच दिवसीय मल्टिमिडीया प्रदर्शनाचे आयोजन

केंद्र शासनाच्या विकास योजनांवर आजपासून पाच दिवसीय मल्टिमिडीया प्रदर्शनाचे आयोजन
केंद्रीय संचार ब्यूरो आणि जिल्हा प्रशासन उस्मानाबाद यांचा राष्ट्रीय पोषण महिनानिमित्त विशेष उपक्रम
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव


उस्मानाबाद. दि. ३ – माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने राष्ट्रीय पोषण महिनानिमित्त दिनांक ४ ते ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये आणि केंद्र शासनाचे ९ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणामध्ये पाच दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.

ह्या प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.


 या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने माघील ९ वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे आणि धोरणांची माहिती सह भारतीय भरडधान्याचा इतिहास, ऐतिहासिक नावे, विविध दुर्मिळ प्रजाती आणि आरोग्यासाठी होणारे फायदे या विषयीची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. सोबत गरीब वंचित, आदिवासी, महिला, युवा, शेतकरी, उद्योजक यांच्या विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय, उज्वला गॅस योजना, डिजिटल इंडिया, पंतप्रधान पीक विमा योजना, किसान सन्मान योजना, आवास योजना, पीएम श्री योजना या सारख्या कल्याणकारी योजनांची माहिती चित्र, मजकुर, डिजिटल स्क्रीन आणि एल ई डी टीव्हीच्या माध्यमातून नागरिकांना पाहता येणार आहे. राष्ट्रीय पोषण महिना निमित शहरातील अंगणवाडी सेविका यांच्याकडून भरड धान्यापासून बनविण्यात येणाऱ्या आहार प्रात्यक्षिकाचे आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

पौष्टिक भरडधान्ये, राष्ट्रीय पोषण महिना आणि केंद्र शासनाने माघील ९ वर्षात घेतलेले निर्णय, धोरणे आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जास्तीत जास्त महिला, युवक, शेतकरी, अभ्यासक, स्पर्धा परिक्षाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय संचार ब्युरो, सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments