शेताचा बांध फोडल्याच्या कारणावरून मारहाण,ढोकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
धाराशिव: शेताचा बांध टोकरण्याच्या वादातून झालेल्या भाव भावकीच्या हाणामारीत दोन जणावर ढोकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेती हा जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील विषय असल्यामुळे असल्यामुळे शेताच्या वादातून भावकीत होणारी भांडणे नवीन नाहीत यातून अनेकांची मुडदे देखील पडल्याचे पाहायला मिळते, असाच प्रकार तालुक्यातील पळसप येथे घडला आहे याबाबत ढोकी पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की
पळसप येथे शनिवारी आत्माराव रानबा शिंदे, अक्षय आत्माराम शिंदे यांनी दि.२ रोजी पळसप येथील शेत गट नं 799 पळसप शिवार येथे फिर्यादी बालाजी रानबा शिंदे, वय 45 वर्षे,रा पळसप, ता. जि. उस्मानाबाद यांना नमुद आरोपीने शेतातील बांध टोकारण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन फिर्यादीचा मुलगा विजयकुमार यास कुह्राडीच्या दांड्याने मारुन व चावा घेवून जखमी केले. तसेच तु जर शेतात आला तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी बालाजी शिंदे यांनी दि.02.09.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504,506,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments