Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी श्वेता दुरुगकर यांची निवड

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी श्वेता दुरुगकर यांची निवड

धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी श्वेता दुरुगकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्वेता दुरुगकर या गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी श्वेता दुरुगाकर यांच्यावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खा शरदचंद्र पवार यांचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कार्यरत रहावे व आपण आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडा असा मला विश्वास असल्याचे पत्रात नमूद केले आहे. या निवडीबद्दल दूरकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


प्रतिनिधी रूपेश डोलारे धाराशिव 

Post a Comment

0 Comments