सायबर पोलीस स्टेशन उस्मानाबाद यांच्या वतीने समता माध्यमिक विदयालयात सोशल मिडीया व इंटरनेटचा सुरक्षित वापर या विषयावर सायबर जनजागृतीपर कार्यशाळा संपन्न.
उस्मानाबाद : मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक उस्मानाबाद, मा. श्री नवनीत कॉवत अपर पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे श्रीमती बी. एस. वाकडकर यांचे नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक ए.आर. जाधव तसेच पोलीस अमंलदार शशिकांत हजारे, प्रकाश भोसले, महिला पोलीस अमंलदार शेख यांनी समता माध्यमिक विदयालयात दि,१२ रोजी सोशल मिडीया व इंटरनेटचा सुरक्षित वापर या विषयावर सायबर जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळे दरम्यान समता माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. ऐडके, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी सायबर पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक ए.आर.जाधव यांनी विदयार्थाना मार्गदर्शन करताना सांगितले की, राजकीय व सामाजिक घडामोडीच्या अनुषंगाने तसेच आगामी गणपती व ईद उत्सावाच्या अनुषंगाने आपले सोशल मिडीया अकाउंट वर धार्मिक भावना दुखविणाऱ्या समाजविघातक पोस्ट, फोटो, मजकुर, व्हिडीओ शेअर करुन नका. तसेच अफवांना बळी पडून, कायदा हातात घेवू नका,अश्या कृत्यांवर पोलीसांची करडी नजर असुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होवू शकते असे आवाहन केले. सायबर पोलीस स्टेशन श्री पोलीस अमंलदार भोसले, हजारे व शेख यांनी विद्यार्थ्याना ऑनलाईन गेम तसेच इंटरनेटचा सुरक्षित वापर या विषयावर सखेल मार्गदर्शन केले.
मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन तेरणा इंजिनिअरींग कॉलेजचे विद्यार्थी यांना सदर जनजागृती कार्यशाळेकरीता तृयांना आमंत्रित करुन त्यांना घेवून जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे.
0 Comments