Hot Posts

6/recent/ticker-posts

खेळाडूंकडे सरकारचे दुर्लक्ष - माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

खेळाडूंकडे सरकारचे दुर्लक्ष - माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
राज्यस्तरीय तेंगसुडो कराटे अजिंक्यपद क्रीडास्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न
राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रथम सातारा,द्वितीय धुळे,तर तृतीय धाराशिव,चौथे ठाणे संघ विजेता

तुळजापुर  :  महाराष्ट्र राज्यात खळाडूंची खाण आहे, दर्जेदार खेळाडू निर्माण होत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात सातत्याने क्रिडा स्पर्धांचे आयोजन होण्याची आवश्यकता असून विविध खेळ प्रकारातील राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याची खंत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली.

धाराशिव जिल्हा तेंग सु डो कराटे असोसिएशन तर्फे तुळजापूर येथे दहावी राज्यस्तरीय तेंग सु डो (कोरियन कराटे) अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे  आयोजन केले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, शिवसेना सहसंपर्क प्रमुख नंदूराजे निंबाळकर,स्पर्धेच्या मुख्य आयोजक शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामल वडणे पवार यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ऍड. धीरज पाटील,शिवसेना लातूर सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी,धैर्यशील पाटील,प्रतीक रोचकरी,अमोल कोतवळ, सुनील जाधव,सुरेखा मुळे, श्याम पवार, बाळासाहेब शिंदे, संजय पारवे,किरण व्हरकट, संजय पाटील, राजेश बिलकुले,स्पर्धेचे राज्यअध्यक्ष रॉकी डिसुझा,महासचिव मास्टर सुभाष मोहिते, जिल्हाध्यक्ष मास्टर महमदरफी शेख आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार शाम पवार यांनी मानले.


राज्यस्तरीय तेंगसुडो कराटे अजिंक्यपद क्रीडास्पर्धा 

तुळजापूर शहरातील आयोजित राज्यस्तरीय तेंग सु डो (कोरियन कराटे) अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत 24 जिल्ह्यातील जवळपास 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. साडे सहा फूट उंचीच्या बलाढय ट्रॉफीवर सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावत नाव कोरले, दुसरे बक्षीस धुळे जिल्हा टीम संघाला मिळाले,तिसरे बक्षीस धाराशिव जिल्हा संघाला तर चौथे बक्षीस ठाणे जिल्हा संघास मिळाले.तसेच रनअप पाचवे सांगली जिल्हा संघास,रनअप सहावे लोहारा देवगिरी ग्लोबल अकायदमी संघास, रनअप सातवे तामलवाडी सनराईज इंग्लिश स्कूल संघाने पटकावले.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर 

Post a Comment

0 Comments