Hot Posts

6/recent/ticker-posts

डिजिटल मल्टिमीडिया प्रदर्शनला महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद, पोषण सप्ताह निमित्त सोलापूर येथील केंद्रिय संचार ब्यूरोचा अनोखा उपक्रम

डिजिटल मल्टिमीडिया प्रदर्शनला महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद, पोषण सप्ताह निमित्त सोलापूर येथील केंद्रिय संचार ब्यूरोचा अनोखा उपक्रम

उस्मानाबाद :-  पौष्टिक भरडधान्ये, राष्ट्रीय पोषण महिना आणि केंद्र शासनाने माघील ९ वर्षात घेतलेले निर्णय, धोरणे आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने  माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने पोषण सप्ताह निमित्त उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये आणि केंद्र शासनाचे ९ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर मल्टीमीडिया प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबसे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने माघील ९ वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे आणि धोरणांची माहिती सह भारतीय भरडधान्याचा इतिहास, ऐतिहासिक नावे, विविध दुर्मिळ प्रजाती आणि आरोग्यासाठी होणारे फायदे या विषयीची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते ६ वाजेर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

प्रदर्शनाला महिला आर्थिक विकास  महामंडळाच्या बचत गटातील महिलांनी  प्रदर्शनाला भेट दिल्या. सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी उपस्थित महिलांची प्रदर्शनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली. विजेत्यांना क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण व माविमचा शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

Post a Comment

0 Comments