Hot Posts

6/recent/ticker-posts

सकल धनगर समाजाच्या वतीने तुळजापूर शहरात भव्य रॅली व लातूर रोड चौकात रास्तारोको आंदोलन

सकल धनगर समाजाच्या वतीने तुळजापूर शहरात भव्य रॅली व लातूर रोड चौकात रास्तारोको आंदोलन


तुळजापुर: धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण व तुळजापूर शह आणि नळदुर्ग येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा व्हावा.या संदर्भात सकल धनगर समाजाने तुळजापूर येथे (दि. १८) रोजी शहरात भव्य रॅली व लातूर रोड चौकात रास्तारोको आंदोलन केले.सदरील मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भवानी रोड, महाद्वार, आर्य चौक, कमानवेस, मंगळवार पेठ, तहसील कार्यालय, नगरपरिषद व क्रांती चौक मार्गे लातूर रोड चौकात रॅलीचे रास्तारोको आंदोलनात रुपांतर झाले.

यावेळी घोषणांनी शहर दनानून गेले होते. त्यानंतर रास्तारोको साठी ठिय्या देऊन अनेक मान्यवरांची आवेशपूर्ण भाषणं झाली.

दुसरे म्हणजे आंदोलन स्थळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थिती दर्शवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तुळजापूरात छत्रपती शिवाजी महाराज शेजारील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर पुर्णाकृती पुतळा करण्यासाठी रु.50 लाख निधीची घोषणा करत, नळदुर्ग येथील मागणी पूर्ण करु, धाराशिव येथे अभ्यासिका सुरु करु असे आंदोलकांना आश्वाशीत केले आहे,तसेच सोमनाथ गुडडे यांनी आपल्या भाषणातून धनगर समजा विषयी असलेली तळमळ व्यक्त केली.

यावेळी श्री गणेश सोनटक्के, राम जवान, नवनाथ मारकड प्रमोद दाणे, ज्ञानेश्वर घोडके, डॉ. जितेंद्र डोलारे, चेतन बंडगर,  आण्णा बंडगर, आप्पासाहेब पाटील, ,संजय घोडके,अरविंद पाटील,बालाजी बंडगर,बालाजी वगरे, शिवाजी कोळेकर, संदीपान मोटे,नागेश बनसोडे, शहाजी हाके, मकरंद भालकरे,बंडू धुते,सुदर्शन पांढरे, सचिन शेंडगे,समाधान देवगुंडे यांचे सह सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर.

Post a Comment

0 Comments