Hot Posts

6/recent/ticker-posts

जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या मराठा आंदोलकावर अमानुष लाठीचार्जची चौकशी करून कडक कारवाई करावी,या मागणीसाठी तुळजापुरात महाविकास आघाडीच्यावतीने जाहीर निषेध

जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या मराठा आंदोलकावर अमानुष लाठीचार्जची चौकशी करून कडक कारवाई करावी,या मागणीसाठी  तुळजापुरात महाविकास आघाडीच्यावतीने जाहीर निषेध 

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापुर 


तुळजापुर:   जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील मराठा समाजाने आपल्या रास्त मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने काढलेल्या मोर्चावर  दि १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे. यामध्ये सहभागी तरुण मुले, मुली, स्त्रिया व वयस्कर वृद्धव्यक्ती ना अमानुषपणे पोलिसांनी मारहाण केलेली आहे. त्यामुळे सदर घटनेचा तुळजापुरात महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलकांना न्याय मिळावा व अशी अन्यायकारक घटना पुन्हा घडू नये म्हणून संबंधित अधिकारी व आदेश देणाऱ्या पदाधिकाऱ्यावर व शासनावर कडक कारवाई करावी व सदरील अन्यायकारक सरकार बरखास्त करावे असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 या निवेदनावर काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील,नगरसेवक रणजित इंगळे,शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम, शहर उपप्रमुख बाळासाहेब शिंदे,शेकाप नेते किरण खपले,उत्तम अमृतराव,अमोल कुतवळ,नवनाथ जगताप,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील,रुबाब पठाण,संदीप गंगणे,शहर अध्यक्ष अमर चोपदार, विवेक शिंदे,शरद जगदाळे,शाहजी नन्नवरे,शिवाजी सावंत,मकसुद शेख, तोफिक शेख, गणेश नन्नवरे,अक्षय परमेश्वर,वाहिद शेख,चिन्मय मगर,चेतन बंडगर,सिद्राम कारभारी,यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments