Hot Posts

6/recent/ticker-posts

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तालुकास्तरीय मध्यवर्ती जयंती कमिटी उमरगा व लोहारा तालुक्याच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तालुकास्तरीय मध्यवर्ती जयंती कमिटी उमरगा व लोहारा तालुक्याच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरी 

धाराशिव : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त उमरगा येथे विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दि.30 रोजी साठे चौक उमरगा येथे जयंती कमेटी व श्रीकृष्ण रक्त केंद्र उमरगा यांचे वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले व तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य दि.31 रोजी पारंपारिक वाद्य संगीत पथक व कलापथक व देखावे मोठ्या उत्साहाने मोठ्या जोमाने मोठ्या आनंदाने भव्य दिव्य मिरवणूक साजरी करण्यात आली.


 जयंती कमिटीच्या आदेशाने मूर्तीचे पूजन बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष अँड कोमल ताई साळुंखे व चंद्रकांत दादा सोनकांबळे बहुजन समाज पार्टी या दोघांनी प्रतिमेचे पूजन करून जयंती कमिटीस व मिरवणुकीस शुभेच्छा दिल्या जयंती कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे व जयंती कमिटीचे कोषाध्यक्ष संजय सरवदे, जयंती कमिटीचे कार्याध्यक्ष व बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, जयंती कमिटीचे उपाध्यक्ष सतीश कांबळे, जयंती कमिटीचे सचिव राम कांबळे, जयंती कमिटीचे जयंती कमिटीचे सहसचिव केशव सरवदे, स्वागत अध्यक्ष डॉ चंद्रशेखर गायकवाड, स्वागताध्यक्ष स्वागत वाघंबर सरवदे, सल्लागार दिलीप गायकवाड, सल्लागार माजी सरपंच शिवाजी दुनगे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर बनसोडे, मिरवणूक अध्यक्ष नेताजी गायकवाड, जयंती कमिटीचे संघटक सुखदेव होळीकर , बहुजन रयत परिषद प्रदेश सरचिटणीस ईश्वर शिरसागर, विशाल गायकवाड, टायगर सेनेचे सचिन शिंदे, छत्रपती कामगार संघटनेचे महादेव वाघमारे, शाहुराज कांबळे लहुजी शक्ती सेनेचे नितीन शिंदे धोंडीराम मोहिते मीनाक्षी गायकवाड यांच्यासह तालुक्यातील सर्व मातंग समाज व बहुजन समाज व सर्व समाजाचे व तसेच सर्व पक्षाचे सर्व संघटनेचे व व सर्व तालुक्याचे नेते गण पदाधिकारी कार्यकर्ते सर्व विभागाचे कर्मचारी बांधव पोलीस विभाग बहुसंख्येने उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


Post a Comment

0 Comments