Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथे घरोघरी गौरीचे उत्साहात स्वागत करण्यात आले

नातेपुते येथे घरोघरी गौरीचे उत्साहात स्वागत करण्यात आले         

          
नातेपुते प्रतिनिधी :  नातेपुते येथे घरोघरी गौरीचे उत्साहात आगमन व स्वागत करण्यात आले हा उत्सव अगदी यंदाच्या वर्षी उत्साहात घरोघरी साजरा होत आहे, प्रत्येकाच्या घरी या सणाची धामधूम पाहायला मिळाली गणपती बाप्पांचे आगमन झाल्यावर तीन दिवसांनी म्हणजे गुरूवारी दि.२१ सप्टेंबर रोजी गौरी आगमन झाले.भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी / गौरी बसवितात. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे शनिवारी २३ सप्टेंबर रोजी  विसर्जन करतात. आपापल्या पद्धती आणि परंपरेप्रमाणे घरातील तुळशी वृंदावन पासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवतात गौरी पूजन घेऊन आलेल्या सुहासिनी हळदी कुंकू सोन पावलांनी गौरी  पूजा करून दर्शन घेऊन उत्साहात गौरीचे स्वागत करतात. यावेळी आशीर्वाद असो व ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना करतात अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे असे ही संबोधिले जाते. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया सुहासिनी हा उत्सव भक्ती भावाने श्रद्धेने करत असतात एका पौराणिक कथेनुसार, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी घरोघरी हा उत्सव साजरा करतात व ज्येष्ठा गौरी हे व्रत ही करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून  ज्येष्ठागौरी असेही या उत्सवाला संबोधले जाते. नातेपुते येथील सौ. सुवर्णा राजेंद्र एकळ त्यांनी घरी गौराईचे उत्साहात व भक्ती भावाने गौराईचे स्वागत करून तिच्या स्वागतासाठी लाडू, करंजी, शंकरपाळी, शेव,अनारसे, गुडदाणी, मैसूरपाक, पेढे, जिलेबी, बर्फी, व विविध प्रकारची खेळणी मांडून त्यांनी गौराई सणाच्या आरासाची जोरदार तयारी केलेली दिसून आली.

Post a Comment

0 Comments