तुळजापुर येथील धनगर समाजाच्या मोर्चास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(शरद पवार गट) तुळजापुर तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा
तुळजापुर : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा एस.टी.प्रवर्गामध्ये समावेश करून तुळजापूर व नळदुर्ग या शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक करणे बाबत दि,१८/०९/२०२३ रोजी तुळजापूर तालुक्यातील समस्त धनगर समाजाने त्यांच्या खालील मागणीसाठी तुळजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे या समस्त धनगर समाजाच्या मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी मा. राज्यपाल महोदयांनी सरकारला निर्देश द्यावेत. यासाठी महाराष्ट्र राज्यपाल यांना जिल्हाअधिकारी मार्फत निवेदन देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट तुळजापूर तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
धनगर समाजाच्या मागण्या :-
१. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गामध्ये सामावेस करावा.
२. तुळजापूर व नळदुर्ग या शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक करणे बाबत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,(शरद पवार गट) तुळजापूर तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी धैर्यशील पाटील, तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, युवक तालुकाध्यक्ष शरद जगदाळे, कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते रुबाब भाई पठाण, धनंजय पाटील,ज्येष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष समाधान धाकतोडे, अनिल वडणे व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर.
0 Comments