Hot Posts

6/recent/ticker-posts

होलार समाजाच्या वतीने ५ सप्टेंबरला माळशिरस तहसील कार्यालयावर धरणे व आंदोलन

होलार समाजाच्या वतीने ५ सप्टेंबरला माळशिरस तहसील कार्यालयावर धरणे व आंदोलन 


नातेपुते प्रतिनिधी : अखिल भारतीय होलार समाज संघटना,माळशिरस तालुक्याच्या वतीने समाजाच्या विविध मागण्या संर्दभात प्रदेशाध्यक्ष नंदकुमार केंगार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मंगळवार दि ५ रोजी सकाळी ११ वाजता  माळशिरस तहसील कार्यालयावर भव्य धरणे व हालगीनाद आंदोलानाचे आयोजन केल्याचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल ढोबळे यांनी सांगितले.न्याय हक्काच्या मागण्यांनसाठी समाजबांधवांनी बहुसंख्येने हजर रहावे असे आव्हान तालुका अध्यक्ष दिनेश जावीर यांनी केले.

या आंदोलना संर्दभात संघटनेने शासनाकडे ८ मुख्य मागण्या केल्या आहेत.त्यामध्ये होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी.शासन निर्णय २०११ पुर्वीची व नंतरची गायरान व गावठाणातील राहत्या घराची अतिक्रमणे नियमानकुल करावी.होलार व दलीत समाजातील भूमीहीन लोकांना शासकीय गायरान जमिनी कसण्यासाठी मिळाव्यात तसेच भूमिहीन व बेघरांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी .

शासनाने प्रत्येक गावास/ग्रामपंचायतीस २५ एकर गावठाणासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी .भुमिहीन व बेघरांना मंजूर झालेल्या घरकुलासाठी शासनाने गायरान व गावठाणातील जागा उपलब्ध करून द्याव्यात.होलार व इतर समाजातील वाद्य कलावंताना मानधनाचा कोटा वाढवुन मिळावा.रेशनकार्ड त्वरीत आॕनलाईन करून मिळावे,तसेच गरजूंना पुरेसा धान्यसाठा उपलब्ध  करून मिळावा.श्रावणबाळ व इंदीरा गांधी तसेच संजय निराधार योजनांची उत्पनाची अट २१ हजार ऐवजी ५० हजार करावी व उत्पन्नाचा दाखला ५ वर्षातून एकदाच मागवा.आदी मागण्यांचा समावेश आहे.

या आंदोलनास बाजीराव केंगार,ब्रह्मदेव केंगार महाराज,लालासो गेजगे,हनुमंत बिरलिंगे,महादेव केंगार,शिवाजी होनमाने,बाळासाहेब पारसे,पांडुरंग नामदास,डॉ  संजय हेगडे,गणेश केंगार,आण्णा गेजगे,दत्ताभाऊ ढोबळे,अभिजित केंगार,सुरज हेगडे,भारत नामदास,बापुदादा ढोबळे सरदार नामदास,तुकाराम कांबळे,विकास केंगार,मोहन पारसे,रणजित नामदास,  दादा करडे,किरण होनमाने,आनंद ऐवळे,गणेश जाधव,आनंद केंगार,शंकर ऐवळे,बापु करडे,बाबुराव जावीर व अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments