गरीब मराठ्यांच्या आजच्या अधोगतीला जबाबदार कोण ?
संकलन ज्येष्ठ पत्रकार : बी टी शिवशरण
महाराष्ट्रातील सोळा राजकीय घराण्या भोवती राज्यातील समाजकारण राजकारण सांस्कृतिक आध्यात्मिक परंपरा व अर्थकारण सुरू आहे महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी एक मे 1960रोजी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्याकडे जबाबदारी सोपवली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र हा सर्व बाबतीत पुढे नेण्यासाठी राज्यातील अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना समान संधी समान न्याय देण्याचे अभिवचन दिले होते .
त्यांनी सांगितले होते की सर्वांचं आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी घरातील एकाला शासकीय नोकरी देण्यात येईल त्या नुसार त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी सहकार समृध्द करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती स्थापन करून सत्तेचे विकेंद्रीकरण केले गाव तालुका जिल्हा पातळ्यांवर जर राजकीय सत्तेचे प्राबल्य कोणाचे होते तर मराठा समाजाचे राज्यात आतापर्यंत सत्ता मराठा समाजाची ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका यात सत्ता मराठ्यांची मराठा समाजाचे मोठे मासे मोठे होत गेले लहान माशांना मोठ्या माशांनी गिळुन टाकले आपला मराठा बांधव आर्थिक दृष्ट्या मागास आहे त्यांना पुढे सर्वच बाबतीत अडचणी येतील त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सधन मराठा नेते मराठा अधिकारी मराठा मंत्री खासदार आमदार यांनी आतापर्यंत काय केले .
राज्यात सहकार क्षेत्रात मराठा नेत्यांचे सहकारी साखर कारखाने उद्योग शिक्षण संस्था औद्योगिक संस्था मेडिकल कॉलेज इंजिनियरिंग कॉलेज आहेत पण या धनदांडग्या मराठ्यांनी आपल्या गरीब मराठा बांधवांच्या मुलामुलींना शैक्षणिक संस्थांमध्ये का मोफत प्रवेश दिले नाहीत त्यांना त्यांच्या संस्थेत कायमस्वरूपी नोकरी दिली असती तर आज गरीब मराठा समाज सक्षम होऊ शकला असता आता गरीब मराठ्यांच्या नावांवर त्यांच्या परिस्थिती वर सधन धनदांडगे मराठा नेते आपलीं राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आक्रमक होतं आहेत लाखोंचे मोर्चे काढून गर्दीचे प्रदर्शन करत आहेत गेल्या काही वर्षांत सकल मराठा समाजाचे अठरा मोर्चे निघाले मोर्चाला करोडो रुपये खर्च केला मग तेच पैसे गरीब मराठा बांधवांच्या कुटुंबांना दिला असता तर
मराठा समाजाचे सधन धनदांडगे नेत्यांनी ठरवले तर गरीब मराठ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करायची तर ते सहज करु शकतात आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये मुलामुलींना मोफत शिक्षण तसेच त्यांच्या औद्योगिक संस्थांमध्ये कायमस्वरूपी नोकरी दिली तर का त्यांचे जीवनमान उंचावणार नाही सधन मराठा समाजाकडे जे शेतमजूर असतात किंवा सालगडी असतात त्यांना किती पगार दिला जातो अगदी तुटपुंज्या पगारावर ते राबत असतात मुलामुलींना शिक्षणासाठी लग्न कार्यासाठी दिलेली उचल फेडण्यासाठी आयुष्याची निम्मी संध्याकाळ होते गरीब मराठ्यांच्या आर्थिक परिस्थिती चा विचार केला तर त्यांचे शोषण पिळवणूक कोणी केली हे लक्षात घेतले पाहिजे .
जे आता गरीब मराठ्यांची बाजू घेऊन रस्त्यावर उतरले आहेत पण तो गरीब मराठा आता कोणामुळे रस्त्यावर आला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा संविधान लिहत होते तेव्हा आरक्षण देण्यासाठी कोणत्या समाज घटकांना कोणत्या निकषांवर देता येईल याचा सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवून अभ्यास करत होते जेव्हा दलित शोषित पिडीत वंचित बहुजन समाजाला आरक्षण त्यांनी संविधानात दिलं मराठा समाज यांना आरक्षण देण्यासाठी त्यांनी तत्कालीन मराठा समाजाचे मातब्बर नेत्यांची त्यांनी चर्चा केली तेव्हा ते सधन मराठा नेते बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणाले,
आम्ही छत्रपती आहोत आम्ही जमिनदार बागायतदार व आर्थिक दृष्ट्या सक्षम आहोत आमच्या समाजाला आरक्षण देऊन तुम्ही आम्हाला मागासवर्गीयांच्या लाईनीत का बसवता तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले जेव्हा तुमच्या समाजाला आरक्षणाची गरज भासेल तेव्हा मात्र ते आरक्षण देण्यासाठी मी नसेन डॉ पंजाबराव देशमुख यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे पटत होते पण त्यावेळी मराठा स्वाभिमान अस्मिता रुबाब असणार्या नेत्या पुढं डॉ पंजाबराव देशमुख यांचे काही चालले नाही आता पुन्हा नव्याने आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना आरक्षण किती व कोणत्या निकषांवर द्यायचे हे केंद्र सरकारने विशेष सुची काढून गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले तरच मार्ग निघेल.
0 Comments