Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षक एक ज्ञान योगी: अनंतलाल दादा दोशी

 शिक्षक एक ज्ञान योगी: अनंतलाल दादा दोशी 
रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
नातेपुते प्रतिनिधी : आयुष्यातले पहिले शिक्षक म्हणजे आपले आई वडील आणि त्यांच्यानंतर आपल्याला घडवतात ते आपले शाळेतले शिक्षक. अगदी बालवर्गापासून ते महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत आयुष्यात अनेक शिक्षक येतात आणि वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वाट दाखवत असतात. या प्रवासात काही शिक्षक आपल्या पालकांइतकेच जवळचे होतात. अशा शिक्षकांचा गौरव करण्याचा, त्यांच्याप्रती प्रेम, आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन.मंगळवार दिनांक ५ सप्टेबर  रोजी रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 या दिवशीचे औचित्य साधून प्रशालेतील ४० शिक्षकांचा  आणि शिक्षेकत्तर कर्मचारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते घेण्यात आला. तसेच प्रशालेतील एकता बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसाचे शिक्षक म्हणून शालेय कामकाजाचा अनुभव घेतला. सदर प्रसंगी बोलताना रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनंतलाल (दादा) दोशी म्हणाले की," शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, चांगला शिक्षक तोच असतो ज्याच्यामधला विद्यार्थी सदैव जिवंत असतो.” आणि खरा तोच ज्ञान योगी असतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीस चेअरमन मा. श्री.प्रमोद भैय्या दोशी यांनी शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. एक दिवसाचे समन्वयक म्हणून पुष्कर दोशी व मुख्याध्यापक म्हणून समर्थ सूळ यांनी जबाबदारी सांभाळली.


सदर कार्यक्रमास अनंतलाल (दादा) दोशी, विरकुमार दोशी, प्रमोद दोशी, वैभव शहा, बबन गोफणे,रामदास गोपणे, दत्ता भोसले, ज्ञानेश राऊत, विक्रम रणवरे, भाग्यश्री दोशी, सारिका राऊत, पालक, विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश हांगे सर,प्रस्ताविक वाघमोडे सर,तर आभार प्रदर्शन पाटील सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments