Hot Posts

6/recent/ticker-posts

आगामी गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे तुळजापूर येथे गणेश मंडळ पदाधिकारी व शांतता समितीची बैठक संपन्न

आगामी गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे तुळजापूर येथे  गणेश मंडळ पदाधिकारी व शांतता समितीची बैठक संपन्न

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर

तुळजापुर :आगामी गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस ठाणे तुळजापूर येथे  गणेश मंडळ पदाधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य मोहल्ला समितीचे सदस्य इत्यादींची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये गजानन घाडगे  पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे तुळजापूर यांनी गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना आवाहन केले की, आगामी गणेशोत्सवा वर्गणी मुक्त तसेच डीजे डॉल्बी न लावता साजरा करावा, वृक्षारोपण, रक्तदान,समाज जागृती कार्यक्रम इत्यादींचे आयोजन करावे, तसेच गणेश मंडळ स्थापन करण्या अगोदर, ऑनलाइन फॉर्म भरून गणेश मंडळाची नोंदणी करावी, गणेश मंडळासाठी अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे, गणेश मंडळाकरिता लावण्यात येणारे स्टेज हे रस्त्याच्या बाजूला वाहनानां अडथळा होणार नाही अशा ठिकाणी लावण्यात यावे, गणेश मंडळाजवळ रात्रपाळी व दिवस पाळी करिता दोन स्वयंसेवक नेमण्यात यावे तसेच नेमण्यात आलेल्या स्वयंसेवकांची माहिती मोबाईल नंबर बोर्ड लावून मंडळाजवळ ठेवावी, विसर्जन मिरवणुकी वेळी स्वयंसेवक नेमण्यात यावे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या. 

या बैठकी करिता औदुंबर कदम शांतता समिती सदस्य, पंकज शहाणे लोकसेवा फाउंडेशन  अध्यक्ष, धैर्यशील कापसे भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य तसेच महेश गवळी मराठा क्रांती ठोक मोर्चा सदस्य, अजय साळुंखे जनहित संघटना, राजेश्वर कदम, आकाश शिंदे, तानाजी कदम आरपीआय, आनंद पांडागळे, ॲडव्होकेट गिरीश लोहारेकर,हेमंत कांबळे याबरोबरच तुळजापूर शहरातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी हजर होते, सदर बैठकीमध्ये पंकज शहाणे यांनी तुळजापूर शहरात  ग्राम सुरक्षा दल चालू करण्यात यावे याबाबत युवकांना आवाहन केले. 

या बैठकीकरिता पोलीस ठाणे तुळजापूर येथील ज्ञानेश्वर कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर  चेनशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक, रवी भागवत पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोपट क्षीरसागर पोलीस हेड कॉन्स्टेबल आदी उपस्थित  होते.


👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.balaghatnewstimes.com/2023/09/blog-post_47.html

Post a Comment

0 Comments