स्वच्छता हीच सेवा या राष्ट्रीय अभियानांतर्गत कौटुंबिक न्यायालय परिसरात स्वच्छता मोहीम
धाराशिव,दि.27: स्वच्छता हीच सेवा या राष्ट्रीय अभियानांतर्गत आज धाराशिव कौटुंबिक न्यायालय येथील परिसर व कार्यालयात नगर परिषद यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या न्या.आर.व्ही.मोहिते, विवाह समुपदेशक एस.डी.मोरे, प्रभारी प्रबंधक आर.एस.मेंढापूरकर, सहाय्यक अधीक्षक व्ही.एल.मारवाडकर व इतर कर्मचारी तसेच विधीज्ञ आणि पक्षकार उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.
प्रतिनिधि रुपेश डोलारे धाराशिव
0 Comments