पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकापैकी थेऊरचा श्री चिंतामणी| गणेश उत्सव विशेष
पुणे : महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे, थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे गणेशाच ठिकाण आहे. भक्ताच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. तसेच येथे कपिल मुनींनी तपश्चर्या केली होती, कपिल मुलींकडे चिंतामणी नावाचे रत्न होते हे रत्न त्यांनी श्री गणेशाच्या गळ्यामध्ये बांधले तेव्हापासून या विनायकास चिंतामणी म्हटले जाऊ लागले अशी आख्यायिका आहे.
पुण्याच्या पेशवाई घरातील अनेक जण थेऊरला सतत जात येत असत. पुणे जिल्ह्यातील पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते थेऊरचा विस्तार माधवराव पेशवे यांनी केला. तसेच माधवराव पेशवे यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील याच ठिकाणी आहे. चिंचवडच्या मोरया गोसावी ने येथे तपश्चर्या केली असा उल्लेख आहे मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तीदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे. थेऊर हे अष्टविनायक तीर्थक्षेत्र मुळा मुठा भीमा या तिन्ही नद्याच्या संगमावर पुणे सोलापूर महामार्गला जोडलेल्या हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून मंदिराकडे येण्यासाठी बसेसची सोय उपलब्ध आहे. त्याचबरोबर थेऊर पासून उरळी कांचनला महात्मा गांधीजींनी स्थापन केलेले निसर्ग उपचार केंद्र आहे.
0 Comments