तुळजापुर येथे शारदीय नवरात्र महोत्सव 2023 च्या अनुषंगाने नगरपरिषदेच्यावतीने अतिक्रमण मोहीम
तुळजापुर: शारदीय नवरात्र महोत्सव 2023 च्या अनुषंगाने नगरपरिषदेच्यावतीने अतिक्रमण मोहीम मुख्याधिकारी श्री.लक्ष्मण कुंभार यांनी सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह दिनांक 6 रोजी अतिक्रमण मोहीम राबविली. सदर मोहिम मंगळवार पेठ कमान वेस, महाद्वार रोड, मातंगी देवी समोरील रस्ता, भवानी रोड, कुंभार गल्ली, दर्शन मंडप,108 धर्मशाळा, घाटशिळरोड परीसरात ही मोहीम राबवण्यात आली. सकाळी 9-30 वा. चालू झालेली मोहीम अखंड पणे दुपारी 3-30 पर्यंत राबविण्यात आली. शारदीय नवरात्र महोत्सव जवळ आल्याने तुळजापूर शहरांमध्ये लाखोच्या संख्येने भाविक येणार असून, भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व व्यापारी यांनी सहकार्य करावे. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करु नये असे आवाहन मुख्याधिकारी श्री.लक्ष्मण कुंभार यांनी केले आहे. मोहिनी दरम्यान भवानी रोडवरील वीस ते पंचवीस वर्षापासून बंद असलेली पिण्याच्या पाण्याची टाकी खुली करण्यात आली असून यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. घटस्थापने पर्यंत मोहिम नियमितपणे राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी कार्यालय अधीक्षक वैभव पाठक,नगर अभियंता अतुल तोंडारे, नगर अभियंता अशोक संनगले, लेखापाल अमित हेलाले, कर.निर. शिवरत़्न अतकरे, रणजित कांबळे, स्वच्छता निरीक्षक -दत्ता साळूंके सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
0 Comments