Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर ते शिखर शिंगणापूर या कावड यात्रा राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मीतीची कोकाटे यांच्याकडून मागणी

तुळजापुर ते शिखर शिंगणापूर या कावड यात्रा राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मीतीची कोकाटे यांच्याकडून मागणी

तुळजापुर: श्रीक्षेत्र तुळजापूर ते शिखर शिंगणापूर या महादेव कावड यात्रा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याची मागणी माढा लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख संजय कोकाटे व उपजिल्हाप्रमुख विनोद पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेत केली.

शुक्रवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात संजय कोकाटे व विनोद पाटील यांनी शक्तीपीठ ते शिवपीठ या महादेव कावड यात्रा नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्मितीची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तत्पूर्वी या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून या संदर्भात मागणी केली आहे. सद्यस्थितीत नुतन राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे काम बंद करण्यात आले आहे.नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचा पूर्ण अधिकार पंतप्रधानाकडे आहे असे गडकरी  यांनी सांगितले. यामुळे आपण नरेंद्र मोदी यांना या राष्ट्रीय महामार्गाबद्दल सविस्तर पत्र व्यवहार करून हा मार्ग केल्याने गौडगाव वैराग माढा चिंचोली भुताष्टे पडसाळी भेंडी परिते बेंबळे वाफेगाव ही ग्रामीण गावे देश पातळीवर येऊन विकसित होतील व या भागातील पिकणाऱ्या धान्यास बाजारपेठ निर्माण होऊन  या मार्गावरून जाणाऱ्या चैत्र महिन्यातील महादेव कावड यात्रा सुखकर होईल अशी मागणी केली आहे‌. ही मागणी 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण केली नाही तर आपण व आपले सहकारी शक्तीपीठ तुळजापूर ते शिवपीठ शिंगणापूर असा 170 किलोमीटर पायी कावड यात्रा काढून पंतप्रधानाचे लक्ष वेधणार आहोत. या नियोजित राष्ट्रीय महामार्गासाठी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर माढयाचे खासदार रणजीतसिंग नाईक निंबाळकर,खासदार राहुल शेवाळे साताराचे पालकमंत्री शंभूराजे देसाई धाराशिवचे पालकमंत्री तानाजी देसाई तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह या महामार्गावरील सर्व ग्रामपंचायतच्या सरपंचाचा या मागणीला पाठिंबा आहे असे कोकाटे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक विनोद पाटील यांनी केले तर आभार विशाल रोचकरी यांनी मानले.

 शक्तिपीठ ते शिवपीठ हामार्ग 170 किलोमीटरचा असून यातील 50 किलोमीटर हा पालखीमार्ग पूर्ण झालेला आहे. उर्वरित 120 किलोमीटर मार्ग तयार करणे गरजेचे आहे, यासाठी अंदाजे दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे असे संजय कोकाटे यांनी सांगितले.



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

Post a Comment

0 Comments