तुळजापुर शहरातील नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.3 राज्यस्तरीय आदर्श प्रेरणादायी शाळा पुरस्काराने सन्मानीत
तुळजापुर -- तुळजापुर शहराचे भूषण असलेल्या ISO 9001:2008 नामांकित शाळेला महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचा 2023-24 सालचा आदर्श प्रेरणादायी शाळा पुरस्कार पनवेल येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके सभागृहामध्ये प्रदान करण्यात आला.
राज्यात शासकीय शाळांची पटसंख्या वेगाने कमी होत असताना केवळ गुणवत्तेच्या जोरावर आपली शाळा राज्यात नावारूपास आली आहे. आपल्या शाळेने जि.प.नपा /मनपाच्या इतर शाळांपुढे आदर्श निर्माण केला आहे. आपल्या शाळेची यशोगाथा इतर शाळांना प्रेरणादायी आहे. आपल्या शाळेस *प्रेरणादायी शाळा* म्हणून सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.असे गौरवोदगार आमदार प्रशांत दादा ठाकूर (पनवेल),आमदार जयकुमार गोरे (मान, खटाव ) यांनी काढले.
मराठवाड्यातील गुणवत्तेत प्रथम क्रमांक आलेली शाळा, सौर उर्जेवर चालणारी शाळा, अत्याधुनिक संसाधनांचा वापर करणारी शाळा, डिजिटल शाळा, विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी गौरविलेली आदर्श शाळा, सर्वाधिक लोकसहभाग मिळवणारी शाळा असे अनेक सन्मान यापूर्वीच शाळेला मिळाले आहेत. आदर्श प्रेरणादायी शाळा या पुरस्काराने त्यात आणखी भर पडली आहे.हा प्रेरणादायी पुरस्कार सर्व तुळजापूर वासियांना समर्पित असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम मोटे सर म्हणाले.
याप्रसंगी नपा.मनपा शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी सर, राज्यचिटणीस अरुण पवार सर, कार्याध्यक्ष सुभाषराव कोल्हे, उपाध्यक्ष ज्योत्स्ना भरडा मॅडम, श्री. संतोष भोसले vice. Pre. IIFL fin. यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री तुकाराम मोटे, शिक्षक सतीश यादव, विश्वजीत निडवंचे, अशोक शेंडगे, निर्मला कुलकर्णी, जालिंदर राऊत, गोविंद प्रताप, ज्योती ताटे, दिव्या राणी हुंडेकरी,अमृता रोकडे,प्रणिता भोरे,लक्ष्मीताई भोजने,रेणुका जाधव, संदीप माने, कल्पना व्हटकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राज्यस्तरीय प्रेरणादायी पुरस्कार मिळाल्याबद्दल तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील, विनोद(पिटू )गंगणे,सचिन भैय्या रोचकरी( मा. नगराध्यक्ष), मुख्याधिकारी श्री. लक्ष्मण कुंभार, पंडितराव जगदाळे (मा. नगराध्यक्ष ) मंजुषाताई देशमाने (मा. नगरसेविका)मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष नारायण भाऊ नन्नवरे, कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, शिक्षण विभाग प्रमुख रणजीत कांबळे, श्री दत्ता डोंगरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. लक्ष्मीताई रणजीत भोजने, नागेश साळुंके व शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य आणि तुळजापूर शहरातील सर्व पालक आणि नागरिकांकडून शाळेचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
0 Comments