Hot Posts

6/recent/ticker-posts

डोळ्याच्या तक्रारी, ॲनिमियासारख्या आजारावर पालक गुणकारी -Benefits of eating spinach

डोळ्याच्या तक्रारी, ॲनिमियासारख्या आजारावर पालक गुणकारी -Benefits of eating spinach


नमस्कार आजच्या लेखामध्ये आपण पालेभाज्या वर्गामधील पालक या भाजीचे महत्व जाणून घेणार आहोत, 90 च्या दशकात टेलिव्हिजनवर पाॅपाॅय -द सेलर मॅन हे कार्टून लागायचं. त्यामधील पाॅपाॅय  हा हिरो अंगात शक्ती येण्यासाठी पालक खायचा. या पालकामुळे त्यांच्या अंगात 10 हत्तीचे बळसंचारायचे यामध्येमातून कुठेतरी पालकाची भाजी ही आरोग्यासाठी पोषक असल्याची मुलाच्या मनावर बिंबवले जात होते. यामुळे लहान मुलींना खुशीने का होईना आपल्या लाडक्या हिरोचे अनुकरण करण्यासाठी पालकापासून बनवलेले पदार्थ खात असत, मात्र काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा मुलांकडून पालक खाण्यास टाळाटाळ करायला सुरुवात होते. हल्लीच्या मुलांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही, कार्टून मधला विनोदाचा भाग सोडला तर पालक आरोग्यासाठी खरोखरच गुणकारी असतो पालक खाण्याचे अनेक फायदे असतात त्यातील काही महत्त्वाचे फायदे आपण जाणून घेणार

पालक खाण्याचे फायदे(डोळ्याच्या तक्रारी, ॲनिमियासारख्या आजारावर पालक गुणकारी -Benefits of eating Spinach)

  • पालक मधील लोह कॅल्शियम फॉस्फरस तसेच अमिनो ऍसिड प्रथिने खनिजे तंतुमय आणि पिष्टमय पदार्थ  अ,ब,आणि क जीवनसत्व फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते या गुणधर्मामुळे सर्वच आजारामध्ये पालक ही पथ्यकर अशी भाजी आहे.
  • मांसाहार न घेण्यासाठी पालक सेवन फायदेशीर आहे कारण मांसाहारातून जेवढ्या प्रमाणात प्रथिने मिळतात तितकीच प्रतून मिळतात.
  • ॲनिमिया या आजारावर पालक अत्यंत उपयुक्त आहे. पालकात रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकन निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध होऊन हाडेही मजबूत होतात.
  • अ जीवनसत्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्याच्या तक्रारी कमी होतात. तसेच रातांधळेपणा या विकारावर पालक एक उत्तम परिपूर्ण औषध आहे.
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments