कर्जमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जनता सरकार मोर्चाच्या वतीने धाराशिव, सोलापूर, लातूर जिल्ह्यात व्याख्यानमाला
महाराष्ट्रातील जनतेच्या कर्जमुक्तीसाठी जनता सरकार मोर्चाचे मोठे पाऊल - नवनाथ दुधाळ
धाराशिव- जनता सरकार मोर्चाच्या वतीने कर्जमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत धाराशिव, सोलापूर व लातूर जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापाऱ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी ही व्याख्यानमाला आहे. ज्यांचे घर, शेती, वाहनावर कर्ज आहे आणि बँका त्रास देत असतील अशा व्यक्तींचे व्याख्यानादरम्यान अर्ज भरून घेतले जाणार असून याबाबत त्यांना लगेच सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जास्तीतजास्त शेतकरी, शेतमजूर व व्यापारी बांधवानी याचा लाभ घेण्याचे आवाहन जनता सरकार मोर्चाचे नवनाथ दुधाळ यांनी केले आहे.
सदरील व्याख्यानमालेअंतर्गत दि. 18 ऑक्टोबर रोजी रोपळे (पंढरपूर), अक्कलकोट येथे व्याख्यान पार पडले. तर दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत धाराशिव तालुक्यातील तेर, तर दुपारी 2 ते 5 या वेळेत मुरुड (जि. लातूर) आणि सायंकाळी 7 वाजता येडशी येथे व्याख्यान होणार आहे. तसेच दि.20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता कळंब तालुक्यातील रत्नापूर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेत हरियाणा येथील डॉ., देवेंद्र बल्हारा, सुनील शर्मा, संजीव शर्मा, चाँद सिंग, नरेंद्र कुमार, महाराष्ट्रातील नवनाथ दुधाळ, व त्यांचे सहकारी कर्जमुक्तीसह विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये न्यू वर्ल्ड ऑर्डर, रुपयाचा इतिहास त्याचबरोबर घर, शेती, वाहनवरील कर्जामुळे शेतकरी, शेतमजूर किंवा व्यापाऱ्यांनी घाबरून जाऊ नये, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, कितीही कर्ज असले तरी जेएसएम वैध पैसे भरून तुम्हाला कर्जमुक्त करील याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच ज्यांचे घर, वाहन किंवा जमिनीवर कर्ज आहे, त्यांनी जनता सरकार मोर्चाकडे अर्ज भरून द्यावेत. त्याना तात्काळ कर्जमुक्तीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. म्हणून या व्याख्यानाला संबंधित गावासह परिसरातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही जनता किसान मोर्चाचे नवनाथ दुधाळ यांनी केले आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
0 Comments