किवी फळ खाण्याचे फायदे जाणून घ्या
नमस्कार आपण आजच्या लेखामध्ये किवी फळ आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेणार आहोत
किवी फळाचे प्रथम उत्पादन चीन येथे घेण्यात आले त्यानंतर हे फळ सर्वत्र प्रसिद्ध होऊन आता लोकल बाजारात सुद्धा ग्राहकांना खरेदी करता येते. तर किवी फळ खाण्याचे आरोग्याला भरपूर फायदे आहेत यामध्ये नैसर्गिकरीत्या रक्त पातळ कमी करण्याचा गुणधर्म असल्याने कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण कमी करण्यास मदत होते त्यासोबत हृदयविकाराची आजार असलेल्या व्यक्तीने किवी फळ खाल्ल्यास उत्तम ठरते. किवी हे फळ दिसायला चिकू सारखी असून आत मधून हिरव्या रंगाची असते संबंधित चयापचयाच्या क्रियेसाठी लाभदायक मानले जाते.
मधुमेह असलेल्या व्यक्तीने किवी फळ खाणे फायद्याचे आहे, कारण या फळाच्या आतील आणि बाहेरील साल ही गुणकारी मानली जाते तसेच पाणी आणि पोटॅशियम चे प्रमाण सुद्धा किवी फळात अधिक असल्याने अंगाला खाज येणे किंवा जळजळ होणे कमी होते विटामिन सी सुद्धा या फळात असून ते अनेक रोगापासून आपला बचाव करते खास करून मलेरिया आणि डेंगू झालेल्या रुग्णांनी आजारपणात किवी फळ खाल्ल्याने त्यांचे उत्तम फायदे दिसून येतात. शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यास ते वाढवण्यासाठी किवी फळ खूप फायदेशीर आहे. दिवसभरातील थकवा दूर करायचा असल्यास किवी फळ खाणे योग्य बाब आहे तशीच रक्तातील साखरेचे प्रमाण किवी फळ संतुलित राखते. किवी फळ खाणे हे आरोग्य तंदुरुस्त राहण्यास सोबतच सौंदर्य खुलवण्यास सुद्धा मदत करते त्यानुसार जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असल्यास किवी खाल्ल्याने ते हळूहळू कमी होतात.
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
0 Comments