साप्ताहिक " इंदापूर संचार " चा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
नातेपुते : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका मुख्य सचिव सागर शिंदे यांनी संपादक म्हणून,इंदापूर तालुक्यातून प्रकाशित होणारे दररोज आणि साप्ताहिक " इंदापूर संचार " चा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध लेखिका कवयित्री प्रतिभा गारटकर यांच्या हस्ते व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे तसेच राज्याचे माजी सहकार मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे पार पडला.
यावेळी सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथदादा माने,कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील,बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ,कृष्णाजी ताटे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांच्यासह पत्रकारिता,राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.इंदापूर संचार चे संपादक सागर शिंदे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
0 Comments