Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील पाटील विद्यालयात मुलींना मोफत सायकलचे वाटप

तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील पाटील विद्यालयात मुलींना मोफत सायकलचे वाटप 
तुळजापुर:  तालुक्यातील चिवरी येथील दत्तू अण्णा पाटील माध्यमिक विद्यालयात दिनांक ६ रोजी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट धाराशिव व ॲटलस लिमिटेड या कंपनीच्या सि एस आर  फंडातून सी एफ टीआय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या १५ गरजू विद्यार्थिनीला मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका एल.के बिराजदार, संस्थेचे संस्थापक पोपटराव पाटील, महाराष्ट्र बँकेचे माझी मॅनेजर गायकवाड साहेब, सरपंच शिवकन्या प्रशांत बिराजदार, उपसरपंच लक्ष्मण लबडे,  प्रभाकर बिराजदार,चंद्रकांत बिराजदार,  विवेकानंद पाटील, शिवकुमार बिराजदार, प्रशांत बिराजदार,अतुल पाटील,केरनाथ बारुळे , आदींसह विद्यालयातील शिक्षक वृंद, पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments