Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय सेवा योजना व पोलीस अधिक्षक कार्यालय यांचे वतीने स्वच्छता ही सेवा अभियान संपन्न

राष्ट्रीय सेवा योजना व पोलीस अधिक्षक कार्यालय यांचे वतीने स्वच्छता  ही सेवा अभियान संपन्न 


धाराशिव : राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने बस स्थानक, धाराशिव व सरकारी जिल्हा स्त्री रुग्णालय, धाराशिव येथे स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत स्वच्छता करण्यात आली. बस स्थानक, धाराशिव येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, धाराशिव व राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क प्रमुख डॉ. रामेश्वर कोठावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव चे संचालक प्रा.डॉ. प्रशांत दिक्षीत, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी मैण्द, डॉ. मकरंद चौधरी, बस स्थानक आगार प्रमुख श्री. रविंद्र कोष्टी, गुप्तवार्ता विभाग रविंद्र कराड, धाराशिव येथील विविध महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल खोब्रागडे, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. माधव उगींले, प्रा. अतुल कुमार अलकुंटे, प्रा गणेश शेटे, प्रा जितेंद्र कुलकर्णी, प्रा वरुण कळसे, डॉ. शिवरत्न खरे, डॉ दिनकर रावसे, डॉ. राणी बारकुल, पुर्णिमा गुंड व राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी स्वच्छता अभियान मध्ये सहभाग नोदंविला व एसटी बस स्टॉप व वर्कशॉप येथे स्वच्छता करण्यात आली. तसेच डॉ. रामेश्वर कोठावळे व जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. कोठावळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना मध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच स्वच्छतेचे महत्व विशद केले. तर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी  यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वच्छता, वृक्षारोपण व शहिदांचा सन्मान या अनुषंगाने मार्गदर्शन केले. 

त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला वृक्षारोपण करावे असे आवाहन केले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सरकारी जिल्हा स्त्री रुग्णालय येथील कार्यक्रमामध्ये स्वच्छता करण्यात आली. तसेच डॉ. श्री रामेश्वर कोठावळे यांनी उपस्थितांना स्वच्छेतीची शपथ दिली तसेच, डॉ कोठावळे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा येजनेचा कसा फायदा होतो व द्यिार्थ्यांनी उपक्रमामध्ये सहभाग नोदंवायला हवा असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉ. पारिसे मॅडम व डॉ माने मॅडम यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments