मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास प्रेरणादायी आहे त्याचे विस्मरण होऊ नये - प्राचार्य सुनील पवार
कळंब :- मराठवाडा मुक्ती मुक्ती संग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान व त्याचा इतिहास आपण विसरत चाललो आहोत या कार्याचे पुनर्जीवन करण्याचे काम मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्स समिती कळंब उत्कृष्टपणे केले आहे यामुळे मुक्ती संग्रामातील संघर्ष कार्याची जाणीव ,आदर पुढील पिढीस समजण्यास मदत होईल आपणास इतिहास नव्हे तर वर्तमानबरोबर भविष्याचाही विचार करावा लागणार आहे या कार्यक्रमात ज्येष्ठांचा मोठा सहभाग आहे या कार्याची धुरा तरुणांनी हातात घ्यावी व ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे आज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर टॅलेंट आहे परंतु त्यांना संधी नाही असे विचार प्राचार्य सुनील पवार शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती कळंब मोहेकर महाविद्यालय सांस्कृतिक सभागृह येथे २७ ऑक्टोबर रोजी आयोजित विविध स्पर्धा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना व्यक्त केले या प्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्य सैनिक बुबाजी जाधव, (धाराशिव ) बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे, ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे संचालक डॉ.संजय कांबळे , प्रभाकर चोराखळीकर ( धाराशिव) ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, मराठवाडा मुक्ती संग्राम समिती कळंबचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ ,सचिव प्रकाश भडंगे ,मार्गदर्शक मकरंद पाटील अंगणवाडी परर्यवेक्षिका रेखा झांबरे, अनुपमा बोरफळकर ,विलास मिटकरी ,महेश जोशी यांची उपस्थिती होती त्यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवा निमित्त शालेय पातळीवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,रांगोळी पोवाडा गायन स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच एकात्मिक बाल विकास यंत्रणेतील कार्यकर्ती, मदतनीस यांच्यासाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण करण्यात आले मुक्ती संग्राम कार्यक्रमासाठी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक बुबाजी जाधव यांचा तसेच विद्युत विभागाचे कर्मचारी केंद्रे ,काकडे ,कळंब ते देव धानोरा हुतात्मा स्मारक भव्य तिरंगा रॅलीत सक्रिय सहभाग याबद्दल शिक्षण ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय एनसीसी विभाग अरविंद शिंदे, दीपक सूर्यवंशी, एकात्मिक बाल विकास यंत्रणा पर्यवेक्षिका रेखा झांबरे यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू ताटे यांनी सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट , यांनी तर आभार प्रसिद्धीप्रमुख माधवसिंग राजपूत यांनी मानले याप्रसंगी आपला देश आपली माती या कार्यक्रमांतर्गत उपस्थितांना मुठभर माती वाटप कार्यक्रम घेण्यात आला ,यशस्वी करण्यासाठी, संताजी वीर, निलेश पांचाळ भाऊसाहेब बारगजे, स्वामी, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली.
0 Comments