Hot Posts

6/recent/ticker-posts

खामसवाडी येथे गाव बंद ठेवून राज्य सरकारची काढली गावातुन प्रतिकात्मक अंत्ययात्रा

खामसवाडी येथे गाव बंद ठेवून राज्य सरकारची काढली गावातुन प्रतिकात्मक  अंत्ययात्रा ; आजच्या साखळी उपोषणाला बसले मुस्लीम समाज बांधव 

कळंब दि.३०(प्रतिनिधी) : तालुक्यातील खामसवाडी येथील मराठा समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले असुन अद्यापही सरकारने मराठा समाजालाआरक्षण दिले नसल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ आज दि.३० ऑक्टोंबर रोजी सकाळी मराठा समाजाच्या आरक्षणास पाठींबा देण्यासाठी गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी शासनाचा निषेध नोंदवून राज्य सरकारची  प्रतिकात्मक अंत्यात्रा काढण्यात आली.त्यानंतर अंत्ययात्रेचे रुपांतर सभेमध्ये होऊन मराठा समाजाच्या अरक्षणा संदर्भात ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोंकण,शरद शेळके, विशाल शेळके,महेश शेळके,प्रा.सुशील शेळके, सुनिल पाटील, चंद्रकांत पाटील, महादेव डोईफोडे, दिनेश खुणे यांच्या सह अनेक मराठा समाजातील बांधवांनी आपले मत व्यक्त केले. तसेच भर चौकात शासनाच्या विरोधात "एक मराठा लाख मराठा", "आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं" , "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे", अशी घोषणाबाजी करून परिसर दुमदुमून टाकला होता. या वेळी प्रतिकात्मक पुतळ्यास भडाग्नी देऊन पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच खामसवाडी येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस सुरू असल्याने  मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आज साखळी उपोषण करण्यात आले आहे.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे अमरण उपोषण आंदोलन करीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून खामसवाडी येथेही गेल्या चार दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला गावातील  वेगवेगळ्या जाती धर्मातील समाज बांधवांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. आज दि. ३०ऑक्टोंबर रोजी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने साखळी उपोषणाच्या माध्यमातून  बसले आहेत. या साखळी उपोषणात इन्नुस फकिरा बेग, सादिक महंमद सय्यद, अजीम अहेमद बेग, सोहेल नजीर शेख, अमर अजमेर शेख, वाजेद आतार,इसुब शेख, महंमद शेख,मौलाना अजगर,अली दस्तगीर शेख, अली शेख,रहीम शेख, हे आज चौथ्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून साखळी उपोषणाला बसले आहेत. तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री.विश्वास कोकणे,व ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर शेळके हे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आपल्या पदाचा वरीष्ठांकडे राजीनामा देणार आहेत. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू रहाणार असल्याचे उपोषणकर्ते  श्री.रमेश साहेबराव शेळके यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments