अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी टेंभी येथे मराठ्यांची आक्रोश जाहीर सभा
धाराशिव: एक मराठा लाख मराठा ,ऊठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो, मराठ्यांचे क्रांतिसूर्य स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समाधी स्थळी आखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी मराठ्यांची आक्रोश जाहीर सभा होणार आहे.
स्व आण्णासाहेब जावळे पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी, मराठा समाजाची होत असलेली फरफट थांबण्यासाठि, मराठा समाजाला शैक्षणिक, नोकरीतआरक्षण नसल्याने समाजाची झालेली दैनिय अवस्थेमध्ये कशा जगत आहे याला वाच्या फोडण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी ,महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे म्हणून मराठा समाजाच्या आरक्षण नसल्याने होत असलेल्या आत्महत्या थांबविण्यासाठी, मराठा समाजातील लोकांची कळवळ यावि म्हणून, मंत्रालयावर मराठ्यांचा आक्रोश जावा म्हणून मराठा आक्रोश सभेचे आयोजन छावा संघटनेने केले आहे. या सभेला नानासाहेब जावळे पाटील हे संबोधित करणार आहेत.मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाअध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांनी केले आहे.
पुढे राजाभाऊ साळुंके म्हणाले की मराठा समाज सर्व जाती, धर्माच्या लोकांना सोबत घेऊन मोठ्या भावाची भूमिका आजपर्यंत बजावत आला आहे, याच मराठा समाज बांधव कुठल्या अवस्थेमध्ये आज जगत आहे हे सर्व समाजातील लोकांना माहिती आहे . इतर सर्व जाती, धर्माच्या समाजातील,लोकांची हिच भुमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे व इतर समाजातिल सर्व लोक आपसा- आपसात चर्चा करतात की खरंच मराठा बांधवांना आरक्षण मिळावे, मराठा बांधवांची होत असलेली फरफट थांबावि, मराठा समाजाला शैक्षणिक, नोकरीतआरक्षण नसल्याने मराठा समाजातील लोक बेरोजगार, दैनिय अवस्थेमध्ये जगत आहेत , आत्महत्या करत आहेत त्या मुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून चर्चा करताना लोक दिसतात त्यामुळे शासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.
त्या अनुषंगाने मराठा समाजाला शैक्षणिक, नोकरीतआरक्षण मिळावे म्हणून टेंभी गाव, स्व अण्णासाहेब जावळे पाटील समाधी स्थान, शिवली,औसा -धाराशिव रस्ता, तालुका-औसा, जिल्हा लातूर,वार -बुधवार, दिनांक 1-11-2023रोजी दुपारी 4 वाजता मराठ्यांच्या आक्रोश सभेला मराठा समाज तसेच सर्व जाती, धर्माच्या लोकांनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन छावा संघटना जिल्हाअध्यक्ष राजाभाऊ साळुंके करत आहेत .
0 Comments