मुलींनो शिका, मोठे व्हा - उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील
नातेपूते प्रतिनिधी : आज अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात अकलूज पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकामार्फत मुलींच्या समस्या, शाळेत येताना जाताना होणारा त्रास, छेडछाड यावर अकलूज च्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते. प्रथम विद्येची देवता व सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते आक्का साहेब व स. म. शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमा पूजन करून सुरवात झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी आपल्या प्रस्तावनेत निर्भया पथकाची व त्यांच्या कामकाजा विषयी माहिती सांगितली. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया हत्याकांडानंतर देशपातळीवर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. केंद्र सरकारने 2013 साली निर्भया फंडची स्थापना केली. या अंतर्गत महाराष्ट्रातसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने नेमन्यात आलेल्या महत्वाच्या पथकांपैकी एक म्हणजे निर्भया पथक. हे पथक प्रो अॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारीऐवजी स्वत:हून दखल घेत कारवाई करणारं आणि रिअॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारींवर आधारित कारवाई करण्याचं काम करतं. निर्भया पथक वेगवेगळ्या ठिकाणांची टेहाळणी करुन उडाणटप्पू मुलं, तरुण, पुरुषांचा शोध घेऊन कार्यवाही करते अशी माहिती दिली.
डी वाय एसपी डॉ भोरे पाटील यांनी मुलींना आयुष्यात जे व्हायचे आहे ते व्हा. जे करायचे ते आपल्याला जमणार आहे का ते ठरवून करिअर निवडा. मुलींना आणि तरुणींना त्यांच्या सुरक्षितता आणि कायदेशीर हक्कांबाबत जाणीव करुन दिली.
पथकाच्यावतीने पहिल्यांदा मुलींची छेडछाड होण्याची शक्यता असणारी ठिकाणं शोधून काढण्यात येतात. त्यामध्ये शाळा, कॉलेजेस, बस स्थानक, बाजारपेठा, हॉस्टेल्स, सिनेमा हॉल, उद्याने या सगळ्यांचा समावेश असतो. निर्भया पथक अशा ठिकाणांची टेहाळणी करुन उडाणटप्पू मुलं, तरुण, पुरुषांचा शोध घेऊन कार्यवाही केली जाते. त्याचबरोबर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते ते सांगितले. तसेच मुलींच्या प्रश्नांचे निराकरण केले. जर तुमच्याबरोबर काही घडत असेल तर तक्रार करा तुमचे नाव कुठेही येणार नाही याची हमी दिली.
सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्यद्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, व्यावसायिक विभागाचे उपप्राचार्य विनायक रणवरे, शिक्षक प्रतिनिधी व माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झाकीर सय्यद यांनी केले तर आभार कल्पना जाधव मॅडम यांनी मानले.
उपसंपादक: विलास भोसले
बालाघाट न्युज टाइम्स
0 Comments