नातेपुते : शिवसेनेच्या वतीने चना डाळीचे वाटप
नातेपुते प्रतिनिधी -देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतुन आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि नाफेडने ६० रु किलो दराने नागरिकांनसाठी दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारत डाळच्या नावाने नातेपुते शिवसेना भवन येथे चना डाळीचे वाटप करण्यात आले.जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत ही योजना पोहचावी म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत व सोलापूर जिल्हायाचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांनी विशेष नियोजन केले.शिवसेनेचे तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपण माळशिरस तालुक्यासाठी व नातेपुते नगरीसाठी ज्या ज्या गोष्टी कार्यसम्राट आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत तसेच शिवसेनेचे जिल्हायाचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांना मागितल्या त्यात त्यांनी वेळोवेळी आपल्याला दिलेल्या आहेत.नातेपुते येथे शंभर खाटांचे महिला हाॕस्पीटल मंजूर करण्यात आले. आता नवरात्रीचे उत्सव सुरु आहे, स्त्री शक्तीचा जागर सुरु आहे प्रत्येक कुटूंबाची गोड दिवाळी करण्याच काम केंद्र व राज्य सरकार करणार आहेत .नगरसेवक रावसाहेब पांढरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास वर्षा धाईंजे, नितीन कोरटकर,दादासाहेब मुलाणी,महेश लांडगे,सतीश बरडकर,सुनील बनकर,पोपटराव शिंदे,प्रमोद चिकने,सनी बरडकर,राजु जाधव,माऊली देशमुख ,जावेद सर,राजु मुलाणी व शिवसैनीक पदाधिकारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 Comments