Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदारांची नावे वगळण्यापूर्वी राजकीय पक्षप्रमुख , प्रतिनिधिंची उमरगा तहसील कार्यालयात बैठक|umarga tahsil karyalay metting

मतदारांची नावे  वगळण्यापूर्वी राजकीय पक्षप्रमुख , प्रतिनिधिंची उमरगा तहसील कार्यालयात बैठक संपन्न 


धाराशिव दि.3 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, धाराशिव यांच्या निर्देशानुसार व दिनांक 28 सप्टेंबर 2023 च्या पत्रानुसार मतदार यादीतुन मयत / स्थलांतरीत / बेपत्ता / दुबार मतदारांचे नाव वगळण्याची विहित प्रक्रिया अवलंबिण्यात येत आहे. या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यापूर्वी राजकीय पक्षप्रमुख , प्रतिनिधी यांना मतदारांची नावे वगळण्याची विहित प्रक्रिया समजून सांगणेसाठी आज दिनांक 03 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता सर्व राजकीय पक्षप्रमुखांची व त्यांच्या प्रतिनिधींची तहसील कार्यालय, उमरगा येथे बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये  तहसीलदार  गोविंद येरमे यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व  मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दि. 31 ऑगस्ट 2023 मधील मतदार यादीतून नोंदी वगळण्यासंदर्भातील नमुना 7 मधील प्राप्त अर्ज/दुबार नोंदणी/ स्थलांतरीत / मयत मतदार याबाबत सर्वसमावेशक व एकत्रित सुधारित सुचनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली व मयत / स्थलांतरीत/बेपत्ता / दुबार मतदारांच्या याद्या उपस्थित राजकीय पक्षप्रमुखांना देण्यात आल्या.यामध्ये विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच आपल्या संपर्कातील सर्वांची मतदार नोंदणी होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव 

Post a Comment

0 Comments