धाराशिव तालुक्यातील वरवंटी परिसरात बिबट्याचे दर्शन, नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये वनविभागाचे आव्हान
धाराशिव : तालुक्यातील वरवंटी, वडगाव सिद्धेश्वर, कामठा, आपसिंगा परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा परिसरातील ग्रामस्थांमध्ये होती. शनिवारी एक वासरू मृत अवस्थेत आढळून आल्याने बिबट्याचा वावर असल्याचा संशय बळावला होता. सोमवारी वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचे छायाचित्र टिपल्याने बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी वनविभागाचे पथक वरवंटी, वडगाव, कामठा परिसरात गस्तीवर आहे.
मागील पंधरा दिवसांपासून येडशी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. गेल्या चार दिवसांपासून वरवंटी शिवारात बिबट्या आढळून आल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात होते. शनिवारी वरवंटी येथील सलाऊद्दीन शेख यांच्या वासराची शिकार बिबट्याने केल्याने वन विभागाचे पथक गेल्या दोन दिवसांपासून वरवंटी, कामंठा, वडगाव सिद्धेश्वर, आपसिंगा शिवारात गस्तीवर आहे. सोमवारी सायंकाळी वरवंटी गेले. त्यामुळे विभागीय वन अधिकारी ए. चौगुले यांनी मंगळवारी परिसरात गस्तीवर होते. नागरिकांनी रात्रीच्या शिवारातील जंगलात बिबट्याचे चित्र वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात टिपले गेले,त्यामुळे विभागीय वन अधिकारी बी. ए. पोळ, सहायक वनसंरक्षक वृषाली तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. ए चौगुले,यांनी मंगळवारी परिसरात जाऊन पाहणी केली,रात्री उशिरापर्यंत वन विभागाचे पथक गस्तीवर होते,रात्रीच्या वेळी नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात बिबट्या आढळून येण्याचे प्रमाण खूप कमी असल्याने या परिसराची आता बिबट्या दिसल्याने हा बिबट्या आला कुठून याची चर्चा रंगू लागली आहे.
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी रुपेश डोलारे .
0 Comments