Hot Posts

6/recent/ticker-posts

खुनाच्या आरोपातून चौघांची निर्दोष मुक्तता ,धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल |Acquittal of four accused of murder, Dharashiv District and Sessions Court verdict

खुनाच्या आरोपातून चौघांची निर्दोष मुक्तता ,धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल 

धाराशिव: तालुक्यातील येडशी येथील खून खटल्यातून चार आरोपीची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. येडशी येथील आनंद पताळे यांचा 2018 साली धारदार शस्त्राने खुन करण्यात  येऊन त्यांचा मृतदेह गावाजवळील अभयारण्यात फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 302, 201,354 डी 34 भादवी नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात गावातीलच आनंद ओवाळ यांच्यासह एकूण चौघांवर गुन्हा नोंद होऊन पोलिसांनी तपासाअंति दोषारोपपत्र न्यायालयात सादर केली होते. या प्रकरणाची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयामध्ये सात जणांची साक्ष घेण्यात आली, मात्र आरोपीच्या बाजूने बाजू मांडताना विधीज्ञ अमोल वरुडकर यांनी विविध मुद्द्यावर केलेला युक्तिवाद व साक्षीदारांची घेतलेली उलट तपासणी तसेच न्यायालयासमोर सबळ पुरावा न येऊ शकल्याने सबळ पुरावे अभावी प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी अमोल ओव्हाळ यांच्यासह इतर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने एडवोकेट अमोल वरुडकर यांनी काम पाहिले, त्यांना एडवोकेट भाग्यश्री कदम, एडवोकेट वैभव खांडेकर, एडवोकेट संजय व्हटकर , एडवोकेट पाटील, एडवोकेट जनक साळुंखे, एडवोकेट रजनीकांत ढेकणे, एडवोकेट बालाजी पोतदार, एडवोकेट सचिन जाधव, यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments