Hot Posts

6/recent/ticker-posts

घरफोडी व दरोडा घालणारऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड.

घरफोडी व दरोडा घालणारऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड


धाराशिव : फिर्यादी नामे- सुभाष शंकर क्षिरसागर, वय 65 वर्षे, रा. लहुजी चौक समोर येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांचे व तानाजी क्षिरसागर, आनंद खंडागळे यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 04.10.2023 रोजी 16.00 ते दि. 09.10.2023 रोजी 11.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन 52 इंची सोनी कंपनीची एलईडी टिव्ही, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, पितळी दोन घागरी, दोन हांडे, तीन तांबे, तानाजी क्षिरसागर यांचे रुममधील रोख रक्कम 17,000₹ व आनंद खंडागळे यांचे रुममधील रोख रक्कम 13,000₹असा एकुण 83,900₹ किंमतीचा माल हा चोरुन नेला होता. अशा मजकुराच्या सुभाष क्षिरसागर यांनी दि.10.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे गुरनं 300/2023 भा.दं.वि.सं. कलम- 454, 457, 380अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सदर गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येरमाळा पोलीस ठाणे गुरन्र. 300/2023 भादवि कलम 457, 454, 380 अन्वये दाख असुन सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी  मिळालेल्या चान्स प्रिंट वरुन सदरचा गुन्हा हा आरोपी नामे- धिरज उर्फ अजय कांतीलाल पवार, रा. सावदरवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांने केला असल्याचे निष्पन्न झाले असुन नमुद गुन्ह्यातील आरोपी व गेला माल शोध घेणे कामी  दि. 10.11.2023 स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना कुर्डवाडी चौक परंडा येथे असताना  गुप्त बातमीदारामार्फत माहित मिळाली की, पोलीस ठाणे येरमाळा येथील गुन्ह्यातील इसम नामे - धिरज उर्फ अजय कांतीलाल पवार, रा. सावदरवाडी ता. परंडा जि. धाराशिव हा शिक्षक कॉलनीच्या पाठीमागे, ता. परंडा येथे एका पत्राचे शेड मध्ये राहत आहे.अशी बातमी मिळाल्याने पथकाने लागलीच नमुद ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला त्यास त्याचे नाव गाव त्यांने त्याचे नाव- धिरज उर्फ अजय कांतीलाल पवार, रा. सावदरवाडी ता. परंडा जि. धाराशिव असे सांगितले. त्यावर सदर आरोपीस नमुद गुन्ह्याविषयी सखोल चौकशी केली असता त्यांनी नमुद गुन्हा मी व माझे दोन साथीदार यांनी केल्याची कबुली दिली. सदर आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेले एलईडी टी व्ही, 3.5 ग्रॅम सोन्याचे दागिने,चांदीचे पॅजन,पितळी भांडी, रोख्‍ रक्कम 30,000 ₹ यापैकी नमुद आरोपी कडून रोख रक्कम 5,000 ₹ व  बजाज प्लसर 70,000₹ किंमतीची असा एकुण 75,000 ₹ चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी  व मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी येरमाळा पोलीस ठाणे येथे  हजर केला आहे. तरी सदर आरोपी विरुध्द पोलीस ठाणे बार्शी शहर गुरनं 05/2022 कलम 395, पोलीस ठाणे बार्शी शहर 594/2021 कलम 395, पोलीस ठाणे बार्शी शहर 566/2021 कलम 395, पोलीस ठाणे माढा जि. सोलापूर गुरनं 382/2021 397, 34, पोलीस ठाणे नेवासा जि. अहमदनगर गुरनं 1042/2023 कलम 395 मध्ये पाहीजे आरोपी आहे.    

 सदरची कामगिरी  मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी,  अपर पोलीस अधिक्षक श्री. नवनीत कॉवत यांचे आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  श्री. वासुदेव मोरे, पोलीस उप निरीक्षक श्री. संदीप ओहोळ, पोलीस हावलदार, विनोद जानराव, फराहान पठाण, समाधान वाघमारे, पोलीस नाईक- जाधवर, चालक पोलीस अमंलदार/ गुरव यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments