Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान ऑनलाईन पध्दतीने सिंहासन पुजा ,नोंदणी करण्याचे आवाहन

श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान ऑनलाईन पध्दतीने सिंहासन पुजा ,नोंदणी करण्याचे आवाहन

धाराशिव.दि,१७ :  महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देविच्या दर्शनासाठी संपुर्ण महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक,तेलंगना व इतर राज्यातून मोठया संख्येने भाविकांची कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी येतात.

 श्री देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते.ही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://shrituljabhavani.org उपलब्ध करून देण्यात येत आहे.

             डिसेंबर 2023  महिन्याच्या  सिंहासन पुजेच्या नोंदणीसाठी वेळापत्रक करण्यात येत आहे.माहे डिसेंबर 2023 मधील सिंहासन पुजा  ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील. याची सर्व भाविक भक्त,महंत, पुजारी,सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी.तसेच भाविकांनी सिंहासन पुजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https://shrituljabhavani.org यावरून सिंहासन पुजा पास बुकींग या मेन्युवर क्लिक केल्यानंतर https://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजेची नोंदणी करावी.

सिंहासन पुजा नोंदणी 21   नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता, 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता.ऑनलाईन ड्रॉप प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी SMS पाठविणे 26 नोव्हेंबर 2023 रोजी 10.30 वाजता,भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट करणे. 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता. 27 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता, सिंहासन संख्या पुर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी SMS पाठविणे 27 नोव्हेंबर 2023 सकाळी 10.30 वाजता,भाविकांनी व्दितीय सोडतीने ऑनलाईन पेमेंट करणे, 27 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता, 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता,प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पुर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी SMS पाठविणे. 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता, भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट करणे.28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता,29 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता,माहे ऑक्टोंबर 2023 या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी प्रसिध्द करणे. 29 नोव्हेंबर  2023 रोजी सायंकाळी 5 वाजता.वरील प्रमाणे भाविकांनी सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन, तुळजापूर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments