Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे अवैद्य दारू विक्री करणाऱ्यावर नळदुर्ग पोलिसांची कारवाई

चिवरी येथे अवैद्य दारू विक्री करणाऱ्यावर नळदुर्ग पोलिसांची कारवाई

धाराशिव: तुळजापुर  तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यावर तिघा जनाविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसाकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की,

नळदुर्ग पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सतिष दिनकर यादव, वय 43 वर्षे, रा. चिवरी  ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.17.11.2023 रोजी 16.30 वा. सु. चिवरी गावातील महालक्ष्मी मंदीराच्या पाठीमागे एमा पत्राच्या शेडच्या बाजूला अंदाजे 2,565 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. तर 2) लक्ष्मण नामदेव कोरे, वय 40 वर्ष रा. चिवरी, ता. जि.  जि. धाराशिव हे दि.17.11.2023 रोजी 17.10 वा. सु.चिवरी गावातील महालक्ष्मी मंदीराच्या पाठीमागे  पत्रयाच्या शेडच्या समोरच्या बाजूला अंदाजे 2,770 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. 3) दादाराव गणपती शिंदे, वय 45 वर्ष रा. चिवरी, ता. जि.  जि. धाराशिव हे दि.17.11.2023 रोजी 17.40 वा. सु. चिवरी गावातील महालक्ष्मी मंदीराच्या पाठीमागे पत्रयाच्या शेडच्या समोरच्या बाजूला अंदाजे 2,150 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या.  यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

Post a Comment

0 Comments