Hot Posts

6/recent/ticker-posts

फुले एज्युकेशन तर्फे जेष्ठसमाजसेवक निवृत्ती ढोक सन्मानित

फुले एज्युकेशन तर्फे जेष्ठसमाजसेवक निवृत्ती ढोक सन्मानित

वावरहिरे - फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन च्या सावतानगर, वावरहिरे येथील बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे जेष्ठ समाजसेवक निवृत्ती महादेव ढोक यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची फुले पगडी,उपरणे आणि फुले दाम्पत्य फोटोफ्रेम खरेदी विक्री ,दहिवडी संघाचे माजी अध्यक्ष ,निवृत्त मुख्याध्यापक विष्णू चव्हाण आणि निवृत्त मुख्याध्यापक नारायण गुरव यांचे शुभहस्ते 17 नोव्ह.23 रोजी रात्री 8 वाजता सन्मानित करण्यात आले.यावेळी त्यांचे 81 पणत्यांनी सत्यशोधक पदधतीप्रमाणे 

वाढदिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सुरुवातीला अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी सर्वांना कडून महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गाऊन घेतला.

या प्रसंगी प्रतिपादन करताना चव्हाण आणि गुरव गुरुजी म्हणाले की निवृत्ती उर्फ बापू ढोक यानी आपले जीवन हलाखीचे कष्टमय जगत स्वतः 4 थी शिक्षण  असले तरी  फुले दाम्पत्याची शिकवण लक्षात घेऊन मुलीला पदवीचे आणि मुलास बी. ई.विद्युत अभियांत्रिकी शिक्षण देऊन वस्तीवरील पहिला मुलगा हणुंमत ढोक  ह्यास उच्चशिक्षित करून MSEB मध्ये तो अभियंता उच्चपदावर काम करीत आहे.हनुमंतराव  माण वासियांना नेहमी मदत, मार्गदर्शन करीत असून ते देखील इतर मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करीत आहे.

कार्यक्रमाचे आयोजन ढोक परिवाराने केले तर शेवटी आभार सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी मानले.

Post a Comment

0 Comments