सासवड येथील चंद्रशेखर श्रीरंग नाझीरकर यांची साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्' मध्ये नोंद
पुणे : पुरंदर तालुक्यातील सासवड येथील चंद्रशेखर नाझीरकर यांची साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे . चंद्रशेखर यांनी त्यांच्या स्वलिखीत कवितासंग्रहामध्ये ' कीर्ती चंद्र ; स्फूर्ती चंद्र ' या शिर्षकाखाली चंद्र या विषयावर मराठी भाषेत सर्वात जास्त कविता करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे...
श्री संत सोपानदेवांच्या पवित्र भूमीत व साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीत हा सन्मान त्यांना प्राप्त झाला...२०१९ मध्ये त्यांचा 'भावनाविश्व' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे... त्यांच्या या यशात त्यांना आई-वडील, शेखर टिळेकर आणि अक्षय नाझीरकर यांची बहुमोल अशी साथ लाभली...
कष्टाचे व्हावे चांदणे
यशाचा चंद्र दिसावा
सदा लोभ असावा
प्रियजनांचा...
अशा काव्यमय भावना त्यांनी व्यक्त केल्या असून त्यांच्या या गौरवाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
चंद्रशेखर श्रीरंग नाझीरकर यांचा थोडक्यात परिचय
चंद्रशेखर श्रीरंग नाझीरकर
शिक्षण : बी. एस् सी. ( कृषी )
पत्ता : १६२-ब, सोपान नगर, सासवड.
मो.नं. : ७४९८२०८८४२
• २०१९ मध्ये भावनाविश्व हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला...
• २०२० मध्ये या काव्यसंग्रहाला उत्कृष्ट साहित्यकृतीचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य गौरव पुरस्कार मिळाला आहे...
• अनेक कविसंमेलनात सहभाग...
• काही कविता कलादीपक या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झाल्या आहेत...
• चंद्र मुखी या ब्लॉगवर सुद्धा लेख लिहीले आहेत...
• २०२३ मध्ये ' कीर्ती चंद्र ; स्फूर्ती चंद्र ' हा काव्यसंग्रह लिहीला...
• त्याची India book of records आणि India's world records मध्ये नोंद झाली...
• त्याचबरोबर संत सोपानदेव यांचा चरित्रग्रंथ लिहीला आहे...तोही प्रकाशनाच्या मार्गावर आहे...
_________________________________________
आपणही आपल्या बालाघाट न्यूज टाइम्स या पोर्टलला व चॅनलला बातमी पाठवू शकता, आपण हे पत्रकारितेचे काम सामाजिक बांधिलकीतून सर्व स्तरातील व्यक्तींच्या कलागुणांना वाव मिळावा प्रेरणा मिळावी व अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सुरू केले आहे. आपण बातमीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. बातमीसाठी संपर्क राजगुरू साखरे मो.9881298946
0 Comments