Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर शहरांमध्ये तोतया तहसीलदाराकडुन व्यापाऱ्याची फसवणूक


तुळजापुर शहरांमध्ये तोतया तहसीलदाराकडुन व्यापाऱ्याची फसवणूक 


तुळजापुर : तुळजापूर शहरामध्ये अज्ञात व्यक्तीने नायब तहसीलदार असल्याचे सांगत शहरातील व्यापाऱ्याची फसवणूक केली ची घटना घडली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की,

 फिर्यादी नामे-दत्ता तुळजाराम कसबे, वय 48 वर्षे, रा. शुक्रवार पेठ मातंग नगर तुळजापूर जि. धाराशिव यांना दि. 23.11.2023 रोजी 11.30 ते 15.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने मी नायब तहसिलदार देशमुख आहे असे सांगून मला तुमची मदत पाहीजे माझे बरोबर तहसिलचे कर्मचारी पण येणार आहे  तुळजापूर येथे तीन दिवस धार्मिक विधीचा कार्यक्रम आहे. दररोज 1200 माणसांचे जेवणाचे नियोजन आहे मला सदर कार्यक्रमासाठी किराणा व कपडे खरेदी करण्यासाठी तुमची गरज आहे असे सांगून फिर्यादी व साक्षीदार यांना सोबत नेहुन मंगळवार पेठ येथील भोसले यांचे कपड्याच्या दुकानातुन 1,25,000₹ किंमतीच्या साड्या घेतल्या व सचिन अग्रवाल यांचे दुकानातुन 40,000₹ किंमतीचे किराणा सामान तसेच रोख रक्कम 5,000₹ वसॅमसंग कंपनीचा एस 23 गॅलक्सी मोबाईल 74,999 ₹ असा एकुण 2,44,999₹ किंमतीचा माल घेवून जावून दत्ता कसबे व इतरांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दत्ता कसबे यांनी दि.25.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 419, 420 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

Post a Comment

0 Comments