Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणासाठी तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धाराशिव:  तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील युवकांनी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना मंगळवारी दिनांक 21 रोजी निदर्शनात आली. मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याची,चिठ्ठी लिहली आहे.या दुर्घटनेमुळे मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिजाऊ नगर परिसरातील राहुल किसन जाधव वय 34 हा मंगळवारी घरी थांबला होता, दरम्यान त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास ही दुर्घटना निदर्शनात आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने मराठा आरक्षणासाठी मी जीव देत आहे असे म्हटले आहे. एक मराठा लाख मराठा असा मजकूरही लिहिला आहे. राहुल जाधव यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे. राहुलचे वडील शेती करीत असुन, राहुलला नोकरी मिळत नसल्याने तो टमटम चालवत होता.  

Post a Comment

0 Comments