Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस तालुक्यातील कारखानदारांकडून पाणी पट्टी व बँकांकडून पिक कर्ज सक्तीची वसुली त्वरित थांबवावी : युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे

माळशिरस तालुक्यातील  कारखानदारांकडून पाणी पट्टी व बँकांकडून पिक कर्ज सक्तीची वसुली त्वरित थांबवावी : युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे  


सोलापुर : शिवसेना व युवासेना सचिव वरून सरदेसाई व युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे  यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके यांच्या नेतृत्वाखाली माळशिरसचे नायब तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन देण्यात आले . 

सद्या सोलापूर जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर आहे .यंदा सरासरी पेक्ष्या कमी पडलेला पाऊस पिण्याच्या पाण्याचा प्रश्नन चऱ्याचा प्रश्नन विजेचा लपंडाव अवकाळी पाऊस अशा चौफेर संकटात शेतकरी राजा  सापडला असताना सोलापूर जिल्ह्यातील  कारखानदार  हे ऊसाच्या बिलातून शेतकऱ्यांची पाणी पट्टी वसूल करून पाटबंधारे खात्यास देत आहेत . शेतकऱ्यांचे पिक कर्ज  बँका सक्तीने वसूल करीत आहेत ग्रामपंचायत नगरपरिषद शेकऱ्यांची पाणी पट्टी घर पट्टी सक्तीने वसूल करीत आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांचे व सामान्य नागरिकांचे जन जीवन विस्कळीत झाले आहे. सध्याच्या भयानक दुष्काळी परिस्थितीचा विचार करता सदरची कपात किंवा वसुली कारखानदारांनी आणी बँक वाल्यांनी त्वरित थांबवावी अन्यथा पालक मंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेऊ देणार नाही असा इशारा युवा सेने कडून दिला आहे.  

यावेळी निवेदन देताना शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव बंडगर युवा सेना विधानसभा तालुका प्रमुख मयूर सरगर शिवसेना शहर प्रमुख माळशिरस अशोक देशमुख युवा सेना उप तालुका प्रमुख दत्ता भाऊ साळुंखे रामभाऊ कचरे युवराज पवार दत्तात्रय काशीद आदींसह शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते .बालाघाट न्युज टाइम्स माळशिरस ,सोलापूर 

Post a Comment

0 Comments