Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मंत्रिमंडळ बैठक दिलासादायक!

राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मंत्रिमंडळ बैठक दिलासादायक! नुकसान भरपाई देण्यासाठी अवकाळी भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश

धाराशिव : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आपले सरकार शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असून  ३ हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल तसेच यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री.अजित पवार साहेब यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या..

राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले सरकार कायम तत्पर असून सर्वांना निश्चितच नुकसान भरपाई मिळेल हा विश्वास आहे..





Post a Comment

0 Comments