तुळजापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन जुगार अड्डयावर छापा,दोघाविरुध्द गुन्हा नोंद
तुळजापुर : शहरातील पोलीस ठाणे हद्दीत जुगार विरोधी कारवाई करून दोन आरोपी विरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.29 रोजी 15.10 ते 15. 30 वा. सु. तुळजापूर पो. ठा.हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)भिमराव बळीराम देडे, वय 40 वर्षे, रा. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 15.30 वा. सु.काक्रंबा ता. तुळजापूर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,090 ₹रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 1)हसन उस्मान नाईकवाडी, वय 48 वर्षे, रा.आपसिंगा, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 15.30 वा. सु.आपसिंगा ता. तुळजापूर येथील तुळजापूर ते आपसिंगा रोडवरील सरकार हॉटेल समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,020 ₹रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
0 Comments