जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्यावतीने उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळास 10 लाख रुपयांपर्यंत विना जामीन कर्ज व NSFDC केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत 50 लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढविणेसाठी निवेदन
धाराशिव: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव चे जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्र काका धुरगुडे यांनी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा संदर्भामध्ये निवेदन दिले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या कर्जाच्या प्रकरणासाठी दहा लाख रुपये पर्यंत विना जामीन कर्ज मंजूर केले जाते याच धर्तीवर महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळासाठी दहा लाख रुपये पर्यंत विना जामीन कर्जाचा त्वरित शासन निर्णय व्हावा व महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची एन.एस. एफ.डी.सी (NSFDC) केंद्र सरकारची योजना असून या योजनेअंतर्गत 50 लाख रुपयापर्यंत कर्ज मर्यादा वाढविणे व 35 टक्के पर्यंत सबसिडी देण्याबाबत अजित दादा पवार साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली. व याबाबतचा शासन निर्णय त्वरित करावा अशी विनंती त्यांना करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी आपल्या सहकार्यासोबत अजितदादा यांची भेट घेतली व आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिव जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून चा आजचा पाचवा कार्य अहवाल अजित दादा व प्रदेशाध्यक्ष मा.खा.सुनील तटकरे साहेब यांच्याकडे सादर केला. त्याच सोबत पक्षांच्या जिल्हयातील वाटचाली बाबत सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यात पक्ष संघटन बांधणीसाठी झालेल्या कार्याचा अहवाल यामध्ये सादर केला आहे.
यावेळी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षिरसागर उपस्थित होते.
0 Comments