Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्र काका धुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव महिला तालुकाध्यक्ष सौ.रंजना भोजने यांची नियुक्ती|Appointment of Dharashiv Women Taluka President Mrs. Ranjana Bhojane under the leadership of District President Mr. Mahendra Kaka Dhurgude

जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्र काका धुरगुडे यांच्या  नेतृत्वाखाली धाराशिव महिला तालुकाध्यक्ष सौ.रंजना  भोजने यांची नियुक्ती

धाराशिव: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) धाराशिव  धाराशिव महिला तालुकाध्यक्ष सौ.रंजना गणेश भोजने यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.   नवनियुक्त महिला तालुकाध्यक्ष भोजने यांना   जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते  नियुक्तीचे पत्र  देण्यात आले.

मा.श्री.महेंद्र काका  धुरगुडे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली  यांची नियुक्ती करण्यात आली.  

सौ.भोसले यांनी या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा. शरद पवार साहेब गटाच्या महिला  तालुकाध्यक्षपदी काम केले असून त्यांना काम करण्याचा अनुभव असून  पक्षाला त्यांच्या अनुभवाचा  फायदा होणार आहे.

     धाराशिव तालुक्यातील महीलाचे मजबूत संघटन करून महिलांचे प्रश्न  जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र काका धुरगुडे तसेच राष्ट्रवादी चे नेते यांच्या माध्यमातून मार्गी लावू असे भोजने यांनी सांगितले.तालुकाध्यक्ष पदी मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांचे आभार मानले.

महिला तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र काका धुरगुडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या सोबत शहराध्यक्ष सचिन तावडे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खलील पठाण,अल्पसंख्यांक माजी जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी,महेश,सोशल मीडिया प्रमुख सुहास मेटे  नलावडे,धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, केशेगाव जि.प.गटप्रमुख लिंबराज लोखंडे, आंबेजवळगाव जि.प.गटप्रमुख सुरेश राठोड,  अमोल कसबे, अरफात काझी, समीर खतीब तसेच  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments